Register

नोंदणी अर्ज

खालील बटण दाबून नोंदणी करा

Google form link


वसई आयडॉल - २०२५ नियमावली

१) सदर स्पर्धा वसई तालुक्यासाठी मर्यादित असून १६ ते ६५ या वयोगटातील सर्व स्त्री-पुरुषांसाठी खुली आहे.

२) स्पर्धेची अंतिम फेरी १२/१३ डिसेंबर रोजी कै.अनंतराव ठाकूर नाट्यगृह,पारनाका,वसई येथे घेण्यात येईल.

३) स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये ५००/- असून स्पर्धेचा अर्ज व प्रवेश शुल्क स्पर्धकांनी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन भरावयाचे आहे. स्पर्धकांनी अर्जासोबत आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे.

४) स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी मो. क्रमांक 9850571610, 7770074110 व 9004685330 वर संपर्क करावा.

५) स्पर्धकांना नियोजित स्थळी वेळेत व स्वखर्चाने यावे लागेल.

६) स्पर्धकांना फक्त मराठी (चित्रपट गीत,भावगीत,भक्तिगीत,पोवाडा लावणी,गझल) किंवा हिंदी चित्रपटातील (गीत, भक्तीगीत, गझल, कव्वाली) सादर करावी लागतील. स्पर्धेच्या एकुण दोन बाद फेरी (एलिमिनेशन राऊंड) परीक्षकांच्या मार्गदर्शना प्रमाणे होतील.पहिल्या बाद फेरीत एकूण स्पर्धकातून ५० स्पर्धकांची निवड दुसऱ्या फेरीसाठी केली जाईल.

७) दुसऱ्या बाद फेरी नंतर परीक्षकां कडून अंतिम फेरीसाठी १० स्पर्धकांची निवड केली जाईल.

८) अंतिम फेरी खालील प्रमाणे होईल–(तीन फेरीत)

अ) पहिल्या फेरीत १० स्पर्धकातून ५ स्पर्धकांची दुसऱ्या फेरीसाठी निवड केली जाईल.

ब) दुसऱ्या फेरीत ५ स्पर्धकां मधून ३ जणांची निवड तिसऱ्या व अंतिम फेरी साठी केली जाईल.

क) तिसऱ्या व अंतिम फेरीत वसई आयडॉल –२ चे विजेते जाहीर केले जातील.

९) अंतिम फेरीत स्पर्धकांना वाद्य वृंदा समवेत (लाईव्ह म्युझिक) निवडलेली गाणी सादर करावी लागतील.

१०) अंतिम फेरी आधी निवड झालेल्या स्पर्धकांना दोन वेळा रिहर्सल वाद्य वृंदा (लाईव्ह म्युझिक) समवेत दिली जाईल.

११) अंतिम फेरी विजेते पारितोषिके खालील प्रमाणे-

१) प्रथम क्रमांक रू.२५०००/- स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक .

२) द्वितीय क्रमांक रू.१५०००/- स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक.

३) तृतीय क्रमांक रू.१००००/- स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक.

४) चतुर्थ व पाचवा क्रमांक प्रत्येकी रु.५०००/– स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

अंतिम फेरीतील उर्वरित स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येतील.

१२) संपूर्ण स्पर्धे बाबत परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.

१३) स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचे हक्क आयोजकांकडे अबाधित राहतील.

१४) ऑडिओ,व्हिडिओ व सोशल मिडीया संबंधित प्रसारणाचे सर्व हक्क आयोजका कडे असतील.

आपले स्नेहांकित

श्री.रॉबर्ट(रॉबी)आल्मेडा अध्यक्ष

श्री.विक्रांत चौधरी उपाध्यक्ष

श्री.अजित चौधरी सचिव

श्री.ऑस्टिन डायस खजिनदार

वसई आयडॉल फाउंडेशन

सांस्कृतिक व कार्यकारी मंडळ समिती

वसई आयडॉल फाउंडेशन

नोंदणीकृत कार्यालय : ९८/५, तिवरभट , सालोली , वसई (पश्चिम) पालघर ४०१२०१

Last Date

३० ऑक्टोबर २०२५